वादळी वाऱ्यामुळे मंडप उडू लागला अन्…., पूर्व मान्सून पावसानं कुठं घातलं थैमान
VIDEO | वऱ्हाडामुळे सुखरुप पडला पार विवाह सोहळा, लग्न सोहळ्यात नेमकं काय घडलं?
परभणी : मे महिन्यातील उन्हानं वैतागलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता नागरिकांची प्रतिक्षा संपणार आहे कारण उद्यापर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे. उद्या केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होणार असल्याचं हवामान खात्यांन म्हटलं आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं चांगलंच झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यामुळे मंडप उडून जात असताना विवाहानिमित्त जमलेल्या वऱ्हाडीना मंडप धरून ठेवण्याची वेळ आली. परभणीच्या मानवत तालुक्यातील आटोळा येथे पंडित आणि भाले या परिवाराचा मंगल परिणय आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त दोन्ही परिवाराकडील नातेवाईक मंडळी जमली होती. मात्र दुपारी अचानक वादळी वारे सुरु झाले अन बघता बघता मंडप उडू लागला. अखेर उपस्थित नातेवाईक वऱ्हाडी मंडळीना मंडप धरून ठेवावा लागला. त्यामुळे काही काळ विवाहसमारंभात मोठा अडथळा निर्माण झाला होता. काही वेळाने वादळ शांत झाले व विवाह समारंभ उरकण्यात आला.