Yavatmal | यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार
ब्बी हंगामातही नैसर्गिक संकट कायम आहे. दर महिन्याला (Untimely rain) अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके थेट कोमात जात आहेत.
रब्बी हंगामातही नैसर्गिक संकट कायम आहे. दर महिन्याला (Untimely rain) अवकाळी, गारपिट आणि ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके थेट कोमात जात आहेत. पुन्हा शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्ची करुन पिकांची जोपासणा करावी लागत आहे. यामध्ये मात्र, (Agricultural Dipartment) कृषी विभागाने तत्परता दाखवत (Wardha District) वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल अवघ्या दोनच दिवसांमध्ये तयाक करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अहवाल हा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. जिल्ह्यात 8 आणि 9 जानेवारी रोजीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे सुमारे 3 हजार 54 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्याची माहिती असून ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात दाखविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी रोजीपासूनच पावसाळी वातावरण बनलेले होते. त्यातच दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.