आडनाव बदलण्याच्या इशाऱ्यावर गौतमी भडकली; म्हणाली, ‘मला कुणीही कोहीही बोलूदेत…’
VIDEO | गौतमी पाटीलभोवती तिच्या आडनावाचा वाद सुरू, अडनावावरून सुरू झालेल्या वादावर बोलण टाळलं, पण...
मुंबई : सतत तिच्या डान्स आणि नृत्याच्या अदाकारीने लोकांना घायळ करणारी गौतमी पाटील नेहमीच लोकांच्या चर्चेत असते. गौतमी पाटील पहिल्यांदाच काल गुरूवारी विरारमध्ये आली होती. विरार पूर्व येथील खार्डीच्या प्रभाकर पाटील यांच्या घरातील सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गौतमी पाटील हित्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहिला मिळाली. दरम्यान, गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद सुरू झाला आहे. मराठा समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव वापरू नये, असा इशारा दिला होता. गौतमी पाटील हिने जर आपले पाटील हे आडनाव लावले तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका राजेंद्र पाटील यांनी घेतली. त्यावर गौतमी पाटील हिने बोलण टाळलं असलं तरी मात्र तिने त्यावर उत्तर दिल्याचे येथे पाहायला मिळाले. मी पाटीलच आहे आणि हे नाव मी वापरणारच असे गौतमीने स्पष्टपणे सांगितले. तर माझ्याबद्दल कोणी काहीही बोलू दे तरी मला काही फरत पडत नाही. मी जे कार्यक्रम करते ते सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. माझे हे कार्यक्रम चांगले पार पडत आले आहेत, असे गौतमी पाटीलने म्हटले आहे.