आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नाही ! बघा कुठंल आहे भीषण वास्तव?
VIDEO | अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील खुंटीदा गावातील शिक्षक आपला जीव धोक्यात घालून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना करताय ज्ञानदान देण्याचे कार्य
अमरावती, २४ सप्टेंबर २०२३ | गेल्या चार वर्षांपासून शिक्षणाची गंगा प्रवाहीत करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील खुंटीदा गावातील दोन शिक्षक आपला जीव धोक्यात घालून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे . मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील जवळपास १६५ किलो मीटर अंतरावर असलेले अति दुर्गम गाव म्हणजे खुंटीदा गाव आहे. ज्याठिकाणी ज्यायला रस्ता नाही, वीज नाही, या गावात जर जायचे असेल तर खंडू नदीतून प्रवास करून जावे लागते.या खंडू नदीतील पावसाळ्यातील चार महिने तर अतिशय धोक्याचे असते पावसाळ्याच्या दिवसात गावात जाणे म्हणजे जीवावर कधी बेतलं याचा नेम नाही, गावकऱ्यांना पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो.
अशाही परिस्थितीत खुंटीदा गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत गेल्या पाच वर्षांपासून याच नदीतून प्रवास करत आहे. या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील कित्येक वर्षांपासून गावकरी पुलाची मागणी करत आहे. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.