Ratnagiri Election | दापोली-मंडणगड नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात; अनिल परबांची प्रतिष्ठा पणाला
शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे.
दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 जागांपैकी 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. 13 जागांसाठी 43 उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून 13 उमेदवार उभे असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष 8 उमेदवार उभे आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
Latest Videos