महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; अमरावती हिंसेवर दरेकरांची प्रतिक्रिया
त्रिपुरामध्ये निर्माण झालेल्या धार्मिक तणावाचे पडसाद महाराष्ट्रात उमटणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मुंबई – त्रिपुरामध्ये निर्माण झालेल्या धार्मिक तणावाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटल्याचे पहायला मिळाले आहेत. अमरावतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण आहे. जमावाकडून दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान आता या सर्व प्रकारावर भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटना त्रिपुरात घडली, मात्र काही लोकांकडून महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. हा प्रकार योग्य नसून, सरकारने दंगेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे. तसेच घटना त्रिपुरात घडली आणि हे महाराष्ट्रात दादागिरी करत आहेत, हा प्रकार खपवून घेणार जाणार नाही असा इशाराही यावेळी दरेकर यांनी दिला आहे.
Latest Videos