IIT मुंबईमधील दर्शन सोळंकी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा खुलासा
VIDEO | सुसाइड नोटच्या हस्ताक्षराशी संबंधित हा अहवाल हस्ताक्षर तज्ज्ञांनी केला एसआयटीला सादर
मुंबई : IIT मुंबईमधील दर्शन सोळंकी याने आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. दर्शन सोळंकी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. दर्शन सोळंकी याने आत्महत्या प्रकरणी लिहिलेल्या एका पत्रातील हस्ताक्षर हे दर्शन सोळंकी याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. सुसाइड नोटच्या हस्ताक्षराशी संबंधित हा अहवाल तज्ज्ञाने एसआयटीला सादर केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली सुसाईड नोट दर्शन सोळंकी याने लिहिलेली असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञाने आपल्या अहवालात सांगितले. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवले आहेत.
Published on: Apr 07, 2023 03:18 PM
Latest Videos