मुख्यमंत्री शिंदे यांच्यासंबंधित प्रकरणात दत्ता दळवी यांना जामीन मंजूर, का झाली होती अटक?

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासंबंधित प्रकरणात दत्ता दळवी यांना जामीन मंजूर, का झाली होती अटक?

| Updated on: Dec 01, 2023 | 1:07 PM

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्यानं दत्ता दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय.

मुंबई, १ डिसेंबर २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्यानं दत्ता दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय. रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का? असा सवाल दत्ता दळवी यांनी केला आहे.

Published on: Dec 01, 2023 01:03 PM