Datta Jayanti 2024 : कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, पहाटेपासून मंदिर परिसर भाविकांनी फुललं

Datta Jayanti 2024 : कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, पहाटेपासून मंदिर परिसर भाविकांनी फुललं

| Updated on: Dec 14, 2024 | 11:40 AM

आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक विधी आणि महा अभिषेक देखील सुरू आहेत. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झालेत.

आज राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जात आहे. कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर असलेलं दृश्य वाडीतील दत्त मंदिर दत्त भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. अशातच कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग पाहायला मिळत आहे. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक विधी आणि महा अभिषेक देखील सुरू आहेत. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झालेत. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवट करण्यात आली आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. कृष्णा व पंचगंगा संगमावर असणारे हे नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर रोजी दुपारी 2.33 वाजपर्यंत असणार आहे. दत्त जयंती ही पौर्णिमा तिथीला आणि संध्याकाळी साजरी करण्यात येते. म्हणून 14 डिसेंबरला दत्त जयंतीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे.

Published on: Dec 14, 2024 11:35 AM