कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला उमेदवार परिक्षेपासून वंचित राहणार नाही : Dattatray Bharane
कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही. सदर बाबीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास देण्यात येतील, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मुंबई : कोवीड-19 मुळे गेल्या दोन वर्षापासून MPSC आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होवू शकल्या नव्हत्या. सदर नोकर भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना MPSC परिक्षेकरीता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचार संहिता अंमलात असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर, 2021 ते 15 डिसेंबर, 2021 दरम्यान काढण्यात येईल. कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही. सदर बाबीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास देण्यात येतील, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Latest Videos