'...तर त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई' - Dattatray Jagtap | TET Exam

‘…तर त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई’ – Dattatray Jagtap | TET Exam

| Updated on: Feb 03, 2022 | 1:35 PM

गेल्या महिनाभरात 6122 टीईटी (TET) प्रमाणपत्र (Certificate) पडताळणीसाठी आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली आहे. त्यासर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. प्रमाणपत्रांमध्ये अनिमियता आढळल्यास सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणालेत.

गेल्या महिनाभरात 6122 टीईटी (TET) प्रमाणपत्र (Certificate) पडताळणीसाठी आमच्याकडे आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली आहे. त्यासर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. प्रमाणपत्रांमध्ये अनिमियता आढळल्यास सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणालेत. राज्य सरकारने  परवानगी दिल्यानंतरच नोव्हेंबरमध्ये झालेल्या टीईटी परीक्षेचा निकाल लावणार आहोत, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेत घोटाळा होता. त्या पार्श्वभूमीवर रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. साधारणपणे एक महिन्याच्या कालावधीत आता प्रमाणपत्राच्या संदर्भात पडताळणी करून बेकायदेशीर (Illegal) काम करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. घटनेतील नियमानुसार संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं जगताप यांनी सांगितलंय.