त्यात माझी काय चूक? सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

त्यात माझी काय चूक? सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

| Updated on: Apr 11, 2024 | 4:38 PM

वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्याच सूनेनं गंभीर आरोप केलेत. दरम्यान, सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2020 मध्ये पूजा आणि पंकजचं लग्न झालं. ते लग्न त्यांनी परस्पर केलं. त्यावेळेस पूजाचे कुटुंबिय होते. आमच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हतं...

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्याच सूनेनं गंभीर आरोप केलेत. दरम्यान, सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 2020 मध्ये पूजा आणि पंकजचं लग्न झालं. ते लग्न त्यांनी परस्पर केलं. त्यावेळेस पूजाचे कुटुंबिय होते. आमच्या कुटुंबाला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी वर्ध्याला एक फ्लॅट घेतला. दोघीही चांगले राहत होते. पण त्यानंतर काही समाजकंटकांनी पूजाला हाताशी धरुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला. तुझ्या सासऱ्याकडे पैशांची मागणी कर, असं ब्लॅकमेलिंग केलं. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याची एक कॅसेट होती. ती कॅसेट पंकजच्या हाती लागली. त्यानंतर त्यांच्यात आपापसात वाद झाला. पंकज देवीला राहायला आला. तिथे त्याने देवीला एक घर घेतलं. तिथे त्याचं दुकान आहे. त्या दुकानाच्या वर तो राहतो. मी त्याला त्यावेळेसच बेदखल करुन टाकलं. त्यांची कोर्टात केस सुरु असल्याचे रामदास तडस यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, ज्या लोकांनी त्यावेळेस ब्लॅकमेलिंग केली अशी 10 लोकं होती. त्यापैकी एकजण हत्येच्या गुन्हा प्रकरणात जेलमध्ये होतं. तो आता जामिनावर बाहेर आहे. त्या लोकांनी एक षडयंत्र केलं. याला मारुन टाकायचा. त्याच्या प्रॉपर्टीवर ताबा घ्यायचा असा पूजाला सल्ला दिला. 2020 चं प्रकरण आता पुन्हा बाहेर काढलं. पूजाला फॉर्म भरायला लावला. ब्लॅकमेलिंग केलं. माझी काय चूक आहे?”,असा सवालही रामदास तडस यांनी केला.

Published on: Apr 11, 2024 04:08 PM