Ajit Pawar मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित का? मुख्यमंत्री यांनी थेट सांगितलं कारण
VIDEO | गणेशोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाप्पांचं दिग्गजांनी दर्शन घेतलं होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अनेक राजकीय नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. मात्र यावेळी अजित पवार हे वर्षा निवासस्थानी बसलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता अजित पवार हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित दादा नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर ही पहिली बैठक होती. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार अनुपस्थित होते. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गैरहजेरीचं कारणच सांगितलं आहे. “अजित दादांची तब्येत आज ठीक नाहीय. त्यामुळे ते कॅबिनेटला आलेले नाहीत. त्याचा तुम्ही वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.