अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर पुन्हा खोचक टीका, वयस्कर लोकं संधी…
वयस्कर लोक संधीच देत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तर या टीकेवर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता काय दिलं शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेवर प्रत्युत्तर?
मुंबई, २० जानेवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे शरद पवार यांच्या वयाबद्दल भाष्य करताना दिसताय. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून केलेल्या टीकेवर शरद पवार यांनी देखील जशाच तसे प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, अशातच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या पुन्हा टीकास्त्र डागलं आहे. वयस्कर लोक संधीच देत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तर या टीकेवर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी तरुणांना संधी देत नाही. मग अजित पवार कुठून आले आणि त्यांना कुणी आणलं. त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं आणि असं किती लोकांबद्दल सांगू… अजित पवार सध्या काहीही बोलत आहे. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचं नाही, असे म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे.