विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा, सिद्धिविनायकाच्या चरणी अजित पवार गटाचं साकडं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाच्या नेते मंडळींच्या उपस्थित आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला साकडं घातलं
येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाच्या नेते मंडळींच्या उपस्थित आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला साकडं घातलं. ‘आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात देवदर्शन करुन करतो. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावे हेच साकडं सिद्धिविनायकाला घातले’, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दिली. तर आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाने प्रचाराचा श्रीगणेशा केलेला आहे. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी श्री सिद्धिविनायकाचे पूर्ण पाठबळ आम्हाला मिळेल, हेच आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आला होतो, असे सुनील तटकरे म्हणाले.