Maharashtra budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांकडून विठूनामाचा गजर, बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल...

Maharashtra budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांकडून विठूनामाचा गजर, बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल…

| Updated on: Jun 28, 2024 | 3:27 PM

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विठूनामाचा गजर.... अजित पवार यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झाले.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विठूनामाचा गजर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अंभगाने त्यांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाची सुरुवात केली. ‘बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’, अशा जयघोषाने विधीमंडळ भक्तीमय झाले. विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या. देहूतून आजच तुकाराम महाराजांची पालखी निघाली. उद्या आळंदीतून ज्ञानेश्वरांची पालखी निघेल. महाराष्ट्राची जगभर ओळख दखल घेतलेल्या पंढरीचा युनेस्कोकडे दखल घेण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितसे. अजित पवार यांनी दहाव्यांदा बजेट विधीमंडळात सादर केले आहे. त्यात त्यांनी पहिलीच योजना ही वारकऱ्यांच्या चरणी वाहिली. २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प वारकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रती दिंडीला २० हजार देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. देहू आळंदी पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांचं आरोग्य तपासणी केली जाणार आहे,. मोफत औषध देणार आहोत. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.

Published on: Jun 28, 2024 03:27 PM