लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, क्षमता असणाऱ्या….
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची थोडीफार चर्चा, तर पाच राज्यातील निवडणुका झाल्यावर यासंदर्भात पुन्हा एकदा जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले
मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढवणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर भाष्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची थोडीफार चर्चा झाली आहे, असी माहिती अजित पवार यांनी देखील दिली आहे. तर पाच राज्यातील निवडणुका झाल्यावर यासंदर्भात पुन्हा एकदा जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तर निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांबाबतच विचार केला जाणार असल्याचे म्हणत त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सध्या देशात ५ राज्याच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्या निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलंय.