अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं; नेमकं घडतंय काय?

अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं; नेमकं घडतंय काय?

| Updated on: Oct 22, 2024 | 2:48 PM

राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. रविवारी भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली मात्र शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्याकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र अद्याप इतर पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. असे असताना अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे. अमोल मिटकरी हे अकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते, असेही अमोल मिटकरी म्हणाले. ‘अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील पक्ष कार्यालयात बोलवलं आहे. मी अकोट विधानसभेसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोट हे तीन विधानसभा मतदारसंघ आम्ही मागत आहोत. म्हणून संध्याकाळपर्यंत वाट बघा.’, असे अमोल मिटकरी म्हणाले तर पुढे ते असेही म्हणाले, विदर्भ हे बलस्थान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी जास्तीत जास्त जागा लढल्या पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Published on: Oct 22, 2024 02:48 PM