‘अहो, बायकोनंही माझा हात इतक्यांदा ओढला नाही, तेवढ्यांदा…’; अजितदादांची मिश्किल टोलेबाजी
Ajit Pawar on cm Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या राज्यभरात सुरु आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेबाबत बोलताना अजित पवार यांनी मिश्किल विधान केले आहे.
‘रक्षाबंधन कार्यक्रमात आलेल्या एवढ्या महिलानी माझा हात धरला, ओढला…अहो खरं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यादा माझा हात कधी ओढला नाही. तेवढ्यांदा या महिलांनी माझा हात ओढला’, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली. पुढे अजित पवार असेही म्हणाले की, पण हे सगळं बहिणीच्या नात्याने या महिलांना माझा हात ओढळा. त्या बहिणी आहेत. माझ्या माय माऊली आहेत. त्यांना आनंद झालाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरु आहे. जुन्नर तालुक्यात महिलांनी अजित पवार यांना राखी बांधण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी अजित पवारांनी ही मिश्किल टिपण्णी केली आहे. ‘आज इथं रक्षाबंधन करताना इतक्या मोठ्या प्रमाणत महिला आलेल्या आहेत. राखी बांधताना मी विचारले की माऊली पैसे आले का तर त्या बोलल्या आलेत…. मात्र काही बहिणींना अजून आले नाही. पण त्यांनाही ते पैसे येतील आम्ही शब्दाचे पक्के आहोत’, असंही अजित पवारांनी म्हटलं.