अमोल मिटकरी आणि मनसेच्या वादावर अजित पवार स्पष्टच म्हणाले…
पुण्यातील खडकवासला धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील एका जुन्या वक्तव्याचा वाद उकरून काढला. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पलटवार केला.
कोणतंही कारण नसताना वाद वाढवला जातोय. पुण्यात काहीही घडलं तर पाहणी करण्यासाठी कुणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. कोणतंही कामं करताना भेदभाव करत नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील एका जुन्या वक्तव्याचा वाद उकरून काढला.‘राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे… ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय.’, असा खोचक टोलाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर पुण्यात अचानक पूर आला.. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालायला नको का? असा सवालदेखील राज ठाकरे यांनी अजित पवारांना केला आहे. यावरच राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंना उत्तर देण्यात आलंय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हटलं आणि वाद सुरू झाला. याच अमोल मिटकरी आणि मनसेच्या वादावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.