Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी सोडलं मौन, ‘व्याकूळ होऊन राजीनामा…’
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातोय. अशातच पहिल्यांदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत मौन सोडले आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेला महिला उलटून गेला तरी अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातोय. अशातच पहिल्यांदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत मौन सोडले आहे. ‘आरोप सगळ्यांवर होतात. पण त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही? हे समोर आल्याशिवाय राजीनामा मागणं योग्य नाही. पण काहीजण होणाऱ्या आरोपांवर व्याकूळ होऊन राजीनामा दिलाय. धनंजय मुंडे यांचं स्पष्ट मत आहे की, बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणताही संबंध नाही. कोणत्याही एजन्सीकडून चौकशी करा… असं जी व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळी काम करत असताना दोषी नसतानाही कोणावर अन्याय होता कामा नये’, असं म्हणत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. तर अजित पवार पुढे असंही म्हणाले, जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई करेन. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे? असा सवालही अजित पवार यांनी केला.