वाढलेली ढेरी... अजित दादा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात 'पोटसूड', काय केली टीका बघा

वाढलेली ढेरी… अजित दादा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ‘पोटसूड’, काय केली टीका बघा

| Updated on: Dec 07, 2023 | 12:08 PM

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील टीका आता वाढलेल्या ढेरीवर येऊन पोहोचली आहे. एकाच पक्षात दोन गट पडल्यानंतर दोघांकडून वार-पलटवार होत आहे. मात्र आता एकमेकांची पोटं कशी सुटली आहेत यावरून टीका होत आहे.

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : राजकारण असो की समाजकारण कुणाच्या पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये, असे म्हटले जाते. पण सध्या अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये पोटसूड रंगल्याचे पाहायला मिळाले. आधी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली. तर जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील टीका आता वाढलेल्या ढेरीवर येऊन पोहोचली आहे. एकाच पक्षात दोन गट पडल्यानंतर दोघांकडून वार-पलटवार होत आहे. मात्र आता एकमेकांची पोटं कशी सुटली आहेत यावरून टीका होत आहे. याची सुरूवात केली अजित पवार यांनी… नवी मुंबईतील नेरूळमध्ये शरद पवार यांची सभा झाली यावेळी जितेंद्र आव्हाड त्यांच्या बाजूला होते. त्याच फोटोवरून नाव घेता अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

Published on: Dec 07, 2023 12:02 PM