अजितदादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्यालाच फोन अन् मिनिटात केलं खरं-खोटं
शिक्षकांच्या रखडलेल्या पगारासंदर्भातील प्रश्नावरून थेट अर्थविभागातील अधिकाऱ्यांना दादांनी फोन लावला. त्यांना शिक्षकांचा पगाराचा निधी दिला गेला की नाही? यासंदर्भात विचारणा केली. अधिकाऱ्यांनी निधी दिला गेला असल्याचे उत्तर दिले.
राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असून त्यांना तो दिला गेला नसल्याच्या बातम्या समोर आल्यात. त्याबाबात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सवाल करण्यात आला. यावेळी अजित पवार काहीसे पत्रकारांवर भडकले आणि त्यांनी थेट भर पत्रकारपरिषदेतून अर्थ विभागातील एका अधिकाऱ्यालाच फोन केला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांनी फोनवरून अधिकाऱ्याला शिक्षकांच्या पगारासंदर्भात विचारणा केली. पगाराचा निधी दिला गेला का नाही? यासंदर्भात खातरजमा केली. त्यावेळी अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी पगाराचा निधी दिला गेल्याचे सांगितले. अजित पवार यांनी तत्काळ अॅक्शन घेतल्याने अजित पवारांच्या कृतीचे कौतुक केले जात आहे. अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना शिक्षकांचा पगार झाला नसल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे पगार वेळेवर झाले पाहिजे. असे म्हणत त्यांनी थेट अधिकाऱ्यालाच फोन केला. यानतंर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पगाराचे सर्व पैसे संबंधित विभागाला दिले आहेत.