चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याने अजित पवार नाराज, बोलून दाखवली खंत
जित पवार विरोधामुळे कुटुंबात एकटं पडले असताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय
चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव करायचाय बाकी काही नको असं वक्तव्य बारामतीत केलं होतं. यावरूनच अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भिती वाटते. महायुतीच्या समन्वय बैठकीत अजित पवार यांनी ही आपली खंत बोलून दाखवल्याची माहिती आहे. ‘शरद पवार यांचा पराभव करणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे. आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो’, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. अजित पवार विरोधामुळे कुटुंबात एकटं पडले असताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली होती. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Published on: May 08, 2024 05:04 PM
Latest Videos