अजित पवारांनी ताफा थांबवला अन् गाडीतून उतरले, अपघातग्रस्ताच्या मदतीला दादा धावले, नेमकं काय झालं?
अजित पवार स्वतः आपल्या कारमधून उतरून अपघातग्रस्त व्यक्तीची चौकशीसाठी पुढे आले. सगळा प्रकार नेमका काय घडला याची माहिती घेत अजित पवार यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला समजावले. अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला धावल्याचे या व्हिडीओ दिसतेय.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हय़ाचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज पुण्यात अजित पवार यांनी एका अपघातग्रस्ताला मदत केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. हा अपघात अजित पवार यांच्या समोरच झाल्याने अजित पवार यांनी आपला ताफा थांबवला. दादांनी ताफा थांबवून अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला धावले आणि यावेळी अजित पावारांनी त्या अपघातग्रस्ताची विचारपूस केली. इतकंच नाहीतर ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टरांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले. अपघात झाल्याचे दिसताच अजित पवारांनी आपला थांबा थांबवला यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या अपघातग्रस्त व्यक्तीची मदत केली. बघा व्हिडीओ
Published on: Sep 10, 2024 12:06 PM
Latest Videos