‘तुम्हाला इथे काय XXX….’, उद्घाटनाला गेले पण झापलं अधिकाऱ्यांना, अजितदादा कोणावर भडकले?

अजित पवार हे आपल्या परखड, रोखठोक बोलणं आणि विनोदी भाषण शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे नेहमी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात कुचराई करणा-यांना दादा नेहमी झापतांना दिसतात. जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन करायला गेले असताना अजित पवार यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या चांगलंच फटाकरत धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

'तुम्हाला इथे काय XXX....', उद्घाटनाला गेले पण झापलं अधिकाऱ्यांना, अजितदादा कोणावर भडकले?
| Updated on: Aug 26, 2024 | 5:37 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील जीएसटी भवनच्या इमारतीचे आज उद्घाटन करण्यात आले. यासोबतच वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्यांचं पाहायला मिळालं. कामांची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली की ती कामं लवकर आवरण्यासाठी केली हे देखील लक्षपूर्वक पाहिलं. यावेळी त्यांनी थेट अधिकाऱ्याची कानउघडणी केली. जीएसटी भवनच्या इमारतीचे आज उद्घाटन करताना इमारतीकडे जाताना तेथील पहिल्या पायरीवर सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हते. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारले हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहून गेल्याचे म्हटले. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवार भडकले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो.. मग हे कशाला झक मारायला ठेवलं का? असा सवाल दादांनी केलाय.

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.