काल राहुल गांधी, आज अजित पवार... टॅक्सी चालकासोबत घेतला भोजनाचा आस्वाद

काल राहुल गांधी, आज अजित पवार… टॅक्सी चालकासोबत घेतला भोजनाचा आस्वाद

| Updated on: Aug 20, 2024 | 5:48 PM

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल टॅक्सीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. इतकच नाहीतर या प्रवासादरम्यान राहुल गांधींनी टॅक्सीचालकासोबत गप्पा मारत त्याचा उदरनिर्वाह कसा चालतो. हे जाणून घेतले. त्यानंतर अजित पवार यांनी देखील टॅक्सी चालकांसोबत स्नेहभोजन केल्याचे पाहायला मिळाले

महाराष्ट्रात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. पुण्यात जनसन्मान यात्रा झाल्यानंतर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही मुंबईत दाखल झाली. यावेळी नवी मुंबईतील मानखुर्द येथे रिक्षा चालकांसोबत अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर अजित पवार यांनी काळी-पिवळी टॅक्सीमधून प्रवास केला. यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुंबईतील पक्षाचे नेतेही होते. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस्चाय इतर नेत्यांनी टॅक्सीमधून प्रवास केल्याचा एक व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत असताना आता अजित पवार यांनी काल रात्री नवाब मलिक यांच्या कार्यकर्त्यांसह टॅक्सी चालकांसोबतत स्नेह भोजन केल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांकडून अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांच्या राज्यभरात ठिकठिकाणी सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशातच काल रात्री अजित पवार , प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी एकत्र नवाब मलिकांसोबत आणि टॅक्सी चालकांसोबत स्नेह भोजन केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी देखील जमिनीवर बसून ऑटो टॅक्सी चालकांसोबत जेवण करताना दिसले.

 

 

 

Published on: Aug 20, 2024 05:48 PM