Ajit Pawar : एक-दोन मुलांवर थांबा… देवाची नाही ती आपलीच कृपा, वाढत्या लोकसंख्येवर अजित पवार यांचं मिश्किल भाष्य
VIDEO | वाढत्या लोकसंख्येबाबत सोलापुरात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. दिवसे न् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. कुणी थांबायलाच तयार नाही, असे म्हणत अजितदादांनी मिश्किल टोलेबाजी केली.
सोलापूर, २३ ऑक्टोबर २०२३ | वाढत्या लोकसंख्येबाबत सोलापुरात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना अजित पवार म्हणाले, ओबीसीमध्ये 350 जाती आहेत. मी मराठा समाजाचा आहे. पण माझ्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही पण मराठा समाजातील काही मुलांना गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 35 कोटी होतो पण आता आपण 135 कोटीच्या पुढे गेलो. आपली लोकसंख्या चौपट वाढली आहे. आपण एक-दोन अपत्यावर थांबलं पाहिजे. सर्व समाजाने दोन मुलावर थांबलं पाहिजे. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेलं नाही. देवाची कृपा, देवाची कृपा असं काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते, असे मिश्किल भाष्य अजित पवार यांनी केले. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावर बोलताना अजित पवार म्हणाले, दिवसे न् दिवस पिढी वाढते तसं शेतीत तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कुणी थांबायलाच तयार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली.