सोमय्यांचा अभ्यास खोटा? दादांना दिलासा मोठा; महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अन् दुसऱ्याच दिवशी संपत्तीची वापसी

सोमय्यांचा अभ्यास खोटा? दादांना दिलासा मोठा; महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अन् दुसऱ्याच दिवशी संपत्तीची वापसी

| Updated on: Dec 08, 2024 | 11:31 AM

५ डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आरोपांमुळे जप्त झालेली अजित पवारांच्या संपत्तीवरची जप्ती हटलेली आहे. या योगायोगावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलाय.

अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधित जवळपास एक हजार कोटींच्या संपतीवरची जप्ती कोर्टाने हटवली आहे. त्यामुळे हा आठवडा अजित पवार यांच्यासाठी दुग्धशर्करा योग घेऊन आलेला आहे. ५ डिसेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आरोपांमुळे जप्त झालेली अजित पवारांच्या संपत्तीवरची जप्ती हटलेली आहे. या योगायोगावरून विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केलाय. अजित पवार यांच्या कथित संपत्ती जप्तीनंतर किरीट सोमय्यांनी दिलेला इशारा प्रत्यक्षात इशाराच राहिलाय. जप्तीनंतर पुढे बघा काय होतंय, असं म्हणत सोमय्यांनी अजित पवारांच्या अटकेचं भाकित केलं होतं. मात्र पुढे अजित पवारांवरील आरोप सिद्ध होण्याऐवजी सोमय्याच तोंडघाशी पडलेत. २०२१ ला अजित पवार हे मविआमध्ये उपमुख्यमंत्री होते. तेव्हा किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर आयकर विभागाने अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. पुढे अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालेत. ५ डिसेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ६ डिसेंबरला कोर्टात क्लिनचीट मिळत १ हजार कोटींच्या संपत्तीवरची जप्ती हटली. यावर कोर्टाचा निर्णय अंतिम असं म्हणत सोमय्यांनी उत्तर दिलंय. पण त्यांनी केलेले आरोप कोर्टात का टिकू शकले नाहीत, की सोमय्या दाखवत असलेली कागपत्र खोटी होती का? या प्रश्नाची उत्तर अनुत्तरित आहेत.

Published on: Dec 08, 2024 11:31 AM