...मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य काय?

…मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य काय?

| Updated on: Nov 30, 2023 | 12:50 PM

लोकसभा निवडणुका येत्या काळात होणार असल्याचे म्हणत पहिले लोकसभा निवडणूक, त्यानंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आपलं नाणं खणखणीत आहे

कर्जत, ३० नोव्हेंबर २०२३ : रायगडच्या मातीतून ऊर्जा घेवून जाणार आहोत. तर लोकसभा निवडणुका येत्या काळात होणार असल्याचे म्हणत पहिले लोकसभा निवडणूक, त्यानंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक असे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आपलं नाणं खणखणीत आहे , आपण सिद्ध करून दाखवलं असे सांगत असताना निर्धार संवाद साधत असताना तरूणांईंच्या उत्साहाचा देखील उल्लेख अजित पवार यांनी केला. कर्जतमध्ये अजित पवार यांची सभा सुरू असताना तरूणाईने घोषणाही केली. तरूणाईच्या घोषणाबाजीवर अजित पवार यांनी हे सूचक वक्त्य केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्राचं वातावरण वेगळं असल्याचं पाहिला मिळतंय. तर प्रत्येकाला आपलं म्हणण मांडण्याचा अधिकार आहे. आपलं म्हणणं मांडताना कुठेही समाजात तेढ निर्माण होऊ नये अशी भूमिका असयला हवी, असेही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

Published on: Nov 30, 2023 12:50 PM