अजितदादांनी नेतृत्वावरून शरद पवारांना डिवचलं, ‘काही जण ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा…’
अजित पवार यांनी पुन्हा एकदा नेतृत्वावरून शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. वडिलांची सत्तरी पार झाली तरी हट्टीपणा जात नाही, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंनी काय पलटवार केला?
वडील सत्तरी पार झालेत तरी हट्टीपणा सोडत नाही. जबाबदारी सोपवणार की नाही? असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांच्या मनातलं समोर आलं आहे. पुण्यातील मावळमध्ये विकासकामांचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते झाला. मात्र नाव न घेता अजित पवारांचा टोला हा शरद पवारांना होता. तर जबाबदारी देऊन तुम्ही मार्गदर्शन करा, असं अजित पवार यापूर्वीही अनेकदा म्हणाले. आता पुन्हा सासू-सुनेचं उदाहरण देऊन अजित पवारांनी शरद पवारांना डिवचलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तीन दिवस शरद पवार पुण्यात असून इच्छुकांच्या मुलाखती शरद पवारांनी मराठवाड्यातून सुरू केल्या आहेत. याकरता मराठवाड्यातील इच्छुकांना शरद पवारांनी पुण्यात बोलवून घेतलं. यामध्ये अजित पवारांच्या नेत्यानंही शरद पवारांकडे मुलाखत दिली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट