Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रिपदाची नेमकी योग्य वेळ कोणती? अजित दादा मुख्यमंत्री होणार, कोणी केलं सूचक विधान?
VIDEO | अजित पवार योग्यवेळी मुख्यमंत्री होणार? अजित पवार, आज ना उद्या योग्य वेळी मुख्यमंत्री करणार.... रामराजे निंबाळकर यांना माहितीये का? नेमकं काय केलं सूचक विधान? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | अजित दादांना योग्यवेळी मुख्यमंत्री करु, असे रामराजे निंबाळकर म्हणालेत. त्यामुळे असं काही ठरलं आहे का अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. पण सुधीर मुनगंटीवारांनी कंन्फ्यूजन क्रियेट केलंय. मला शिंदेसोबतचाही भाजप आवडत नाही. शिंदेंसोबतचाही भाजप आवडत नाही. देशाची सेवा करणारा भाजप आवडतो असं मुनगंटीवार म्हणालेत. आता याचा अर्थ नेमका काय ? शिंदे आणि अजित दादांना सोबत घेतल्याचं मुनगंटीवारांना आवडलेलं नाही का ? आता या वक्तव्यावरुन पुढच्या काही तासांत मुनगंटीवारांचंच स्पष्टीकरण येईल किंवा बावनकुळेही बोलतील. ते ज्यावेळी प्रतिक्रिया देतील ते आम्ही दाखवूच. तर अजित पवार, आज ना उद्या योग्य वेळी मुख्यमंत्री करणार असं रामराजे निंबाळकर म्हणालेत. ज्या पद्धतीनं पवारांना पंतप्रधान करण्याचं स्वप्नं घेऊन 1999 ला त्यांना साथ दिली. तशीच साथ आता अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी देत असल्याचं निंबाळकर म्हणालेत. अजित दादांशिवाय दुसरा नेता नाही, असं रामराजे निंबाळकर म्हणतायत. म्हणजेच, सध्या पवार काका पुतण्यांमध्ये दादांमध्येच पुढच्या राजकारणाची क्षमता आहे, हेच सुचवण्याचा प्रयत्न निंबाळकरांचा आहे. असं ते बोलूनही दाखवतायत. स्वत: अजित पवारांनीही, वयाचा दाखला देत शरद पवारांना निवृत्तीचा सल्लाही दिला होता. पण तो सल्ला पवारांनी आपल्या स्टाईलनं धुडकावून लावला. बघा स्पेशल रिपोर्ट