Suresh Dhas : … त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार; सुरेश धस काय म्हणाले?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. भाजप आमदार सुरेश धस त्यांची भेट घेणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवार हे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेठीगाठी घेत आहेत. अशातच बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे देखील बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘इथं पंडितांनी जेवायला बोलवलं आहे. जेवण्यासाठी सर्वच जण असणार आहे. प्रवेश आहे की नाही अजून कळेना… त्यांनी निमंत्रण दिलंय म्हणून आम्ही आलोय’, असं सुरेश धस म्हणाले. आज आढावा बैठक आहे. जिल्ह्यातील विकास कामं कुठपर्यंत पोहोचलेत? या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी ही आढावा बैठक आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारची कामं, प्रकल्पांचं काम कुठंपर्यंत आलंय? याची माहिती देण्यासाठी आपापल्या मतदारसंघातील प्रतिनिधी आपापली बाजू मांडतील त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कामासंदर्भात आदेश देतील, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.