शरद पवारांबद्दल ‘ते’ विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वयक बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबद्दलन नाराजी व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या त्या विधानावरून अजित पवार नाराज असल्याचे समोर आलंय.
महायुतीतील एक दादा दुसऱ्या दादांवर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत शरद पवारांसबंधित जे विधान केलं त्यावरून विरोधकांना टीकेची संधी मिळाली. यावरूनच अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वयक बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबद्दलन नाराजी व्यक्त केली आहे. बारामती लोकसभा प्रचारात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या त्या विधानावरून अजित पवार नाराज असल्याचे समोर आलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या समन्वयक बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. सूत्रांनुसार, हल्ली कुणाला भाषणाला बोलवायलाही मनात भिती वाटते. असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात बारामतीत जाऊन आम्हाला फक्त शरद पवारांचा पराभव हवा आहे. राजकीय तराजूने मोजमाप केल्यास शरद पवारांचा तराजू जास्त वजनदार वाटतो. त्यामुळेच भाजपसाठी त्यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.