Ajit Pawar : अजित पवारांनी आपल्याच मंत्र्यांना इशारा देत टोचले कान, ‘… अन्यथा वेगळा निर्णय घेण्यात येईल’
नागपूरात झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्याच नेत्यांना इशारा दिला असून जोरदार फटकेबाजी करत आपल्याच नेत्यांचे कान टोचलेत. आमदार आणि मंत्र्यांकडून देण्यात येणाऱ्या कारणांवरूनही अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
नागपूरात आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. दरम्यान, या मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्याच नेत्यांना इशारा दिला असून जोरदार फटकेबाजी करत आपल्याच नेत्यांचे कान टोचलेत. आमदार आणि मंत्र्यांकडून देण्यात येणाऱ्या कारणांवरूनही अजित पवार यांनी इशारा दिला आहे. काळानुसार स्वतःमध्ये कसा बदल करायचा यासंदर्भात बोलत असताना स्वतःचं उदाहरण देत अजित पवारांनी त्यांचा एक किस्सा सगळ्यांसोबत शेअर केला. दरम्यान, अजित पवारांनी सगळ्यांसोबत एक किस्सा सांगितल्यानंतर मेळाव्यात एकच हशा पिकला. ‘स्वभावात बदल करायला सुरूवात केली, हसायला लागलो आता चिडचिड करत नाही.’, असं अजित पवार म्हणाले. इतकंच नाहीतर लोकसभा निकालावरही त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले आहे. सुनील तटकरे यांच्या रायगडच्या जागेवरून त्यांनी मिश्कील वक्तव्य केले. ‘लोकसभेत रायगडची जागा गेली असती तर भोपळाच राहिला असता.’, असं ते म्हणाले. तसंच पक्ष संघटना वाढवत असताना झालेल्या चुकांबद्दल देखील अजित पवार यांनी प्रकाश टाकला. विदर्भ आणि मुंबईकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष झालं. यावर देखील भाष्य करत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट