पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार v/s अजित पवार, शरद पवार यांच्याविरोधात अजितदादांचा अॅक्शन प्लॅन काय?

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार v/s अजित पवार, शरद पवार यांच्याविरोधात अजितदादांचा अॅक्शन प्लॅन काय?

| Updated on: Aug 19, 2023 | 11:35 PM

VIDEO | बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जाहीर सभांना अजित पवार यांच्याकडून उत्तर मिळणार? पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांचं खास लक्ष्य, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, १९ ऑगस्ट २०२३ | अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाने सभा घेणे सुरू केले आहे. त्यानंतर आता अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये आलेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याची जबाबदारी अजित पवार यांनी स्वतः घेतली आहे. त्यानुसार पुढच्या रविवारी बीडमध्ये उत्तर सभा होणार आहे. अजित पवार यांनी बंड पुकारून भाजप सोबत सरकारमध्ये जाताच शरद पवारांना इशारा दिला होता. त्यानंतर आता अजित पवार शरद पवार यांना उत्तर सभा घेऊन उत्तर देणार आहेत. शरद पवार यांच्या आतापर्यंत तीन सभा झाल्यात. कराड, येवला आणि बीड मध्ये सभा घेतली. नुकत्याच झालेल्या सभेत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं तर अजित पवार यांचाही समाचार घेतला. आता शरद पवार यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांच्याकडून उत्तर देण्यात येणार आहे. काय आहे अजित पवार यांचा अॅक्शन प्लान? बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 19, 2023 11:33 PM