चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

| Updated on: Sep 25, 2023 | 5:06 PM

VIDEO | ‘2024 पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना ढाब्यावर अन् चहाला न्या’, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल क्लिपवर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, '... पण त्यावर कॅान्ट्रोव्हर्सी करणं योग्य नाही'

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा देखील होत आहे. यात बावनकुळे 2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नयेय यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा.ढाब्यावर जेवायला न्या, असा सूचना करताना ऐकायला मिळतंय. यावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या क्लीपवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे जे बोलले आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असताना त्यांना मार्गदर्शन करताना काही गोष्टी आपण व्यंगात्मकपणे बोलतो. पण त्यावर कॅान्ट्रोव्हर्सी करणं योग्य नाही ते अतिशय चुकीचे आहे.’

Published on: Sep 25, 2023 05:06 PM