आमच्या 'कोट'चा विचार त्यांनी करू नये, देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांना सल्ला

आमच्या ‘कोट’चा विचार त्यांनी करू नये, देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांना सल्ला

| Updated on: Feb 06, 2023 | 12:30 PM

मंत्रिमंडळ विस्तारावरून केलेल्या 'त्या' विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी दिला अजित पवार यांना सल्ला

नवी दिल्ली : अनेक आमदारांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी कोट शिवले आहेत आणि ते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत पण घडी काही मोडणा, यांना काही कुणी पावना, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यासह राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून टोला लगावला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मंत्री आणि आमदारांच्या ‘कोट’चा विचार त्यांनी करू नये. कुणाला कोट घालायचा, कधी घालायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. त्याची दिशाही ठरलेली आहे. योग्यवेळी ते जाहीर करणार असल्याचे म्हणत फडणवीसांनी अजित पवार यांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. नवी दिल्ली येथे उपस्थित असताना माध्यमांशी देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर संवाद साधला आहे.

Published on: Feb 06, 2023 12:28 PM