विशेष अधिवेशन होणार? देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, पडद्यामागे सरकारच्या कोणत्या हालचाली?
fadnavis Meet Ramesh Bais : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट झाली असून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन घेण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात पडद्यामागे सरकारच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन घेण्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक आमदारांकडून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. तर विरोधकांनी देखील राज्यापालांची भेट घेतली होती. त्यामुळे विशेष अधिवेशन घेण्यात येणार की नाही, याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.