Devendra Fadnavis : ‘भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी…’, फडणवीस आक्रमक, ‘मविआ’वर हल्लाबोल
'तमाम सेक्युलरवाद्यांना माझा प्रश्न आहे की हा कोणता सेक्युलरवाद? हे तर मोदींना विरोध करणे', देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विरोधक आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला
चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येत असाल तर हे चांगलंच आहे पण लोकसभेला व्होट जिहाद झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला मतदान केले नाही तर अल्लाहसोबत बेईमानी आहे, असे बॅनर त्यांच्या धर्मस्थळांवर झळकवण्यात आले. तमाम सेक्युलरवाद्यांना माझा प्रश्न आहे की हा कोणता सेक्युलरवाद? हे तर मोदींना विरोध करणे आहे. मुस्लिम जेव्हा एकजूट होण्याची भाषा करतात तेव्हा त्यांना राष्ट्रद्रोहीचा दर्जा दिला जातो आणि हिंदू जेव्हा एक होतात तेव्हा त्याला राष्ट्रवाद म्हटले जाते यावर आपले काय मत आहे या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विरोधक आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची आम्हाला जी भिती वाटत होती ती भिती खरी ठरली आहे. आता महाविकास आघाडी मुस्लिम उलेमांचे तळवे चाटत आहे. आता मुस्लिम उलेमांनी त्यांना समर्थन दिले आहे. त्यांनी 17 मागण्या केल्या होत्या यांनी त्या पत्राद्वारे मान्य केल्या आहेत. त्यामध्ये 2012 ते 2024 दरम्यान मुंबईत जेवढ्या दंगली झाल्या, त्यामधील मुस्लमान आरोपींना सोडून देण्याची मागणी केली आहे आणि हीच मागणी मविआने मान्य केली आहे हे धोकायदायक असून आता मतांचे धर्मयुद्ध करण्याची वेळ आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.