OBC आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी, विजय वडेट्टीवार अन् मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर काय झाली चर्चा?

OBC आंदोलन मागे घेण्यासाठी मनधरणी, विजय वडेट्टीवार अन् मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर काय झाली चर्चा?

| Updated on: Sep 22, 2023 | 1:48 PM

VIDEO | ओबीसी समाजानं आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू, सह्याद्रीवर ओबीसी नेत्यांची 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | ओबीसी समाजाचं आंदोलन सध्या सुरू आहे. तर ओबीसी समाजानं आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत २९ तारखेला मुंबईतील सह्याद्रीवर बैठक असणार आहे. ओबीसी समाजानं आंदोलन मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती दिली. मनोज जरांगे यांनी आंदोलन करणे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांची मागणी ही योग्य नाही. कुठल्याही प्रकारे आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाही. केंद्र सरकारने कायद्यात बदल करुनच हा प्रश्न सुटू शकतो. आम्ही देखील ओबीसी समाजाची मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी याची मागणी केली आहे. मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Published on: Sep 22, 2023 01:45 PM