हेलिकॉप्टर भरकटलं तरीही फडणवीसांच्या निवांत गप्पा सुरूच; अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा
सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन सोहळ्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन सोहळा....
महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी नागपूरवरून गडचिरोलीला जात असताना त्यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे भरकटल्याचे समोर आले. खराब हवामान असल्याने आकाशातील काही दिसेनासे झाले. पण पायलटने कौशल्याने हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या जमिनीवर उतरवले. पायलटने आमचं हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवल्यानंतर आमचा जीव भांड्यात पडला, असा किस्साच अजित पवार यांनी भर सभेतून सांगितला. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन सोहळ्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचे भूमिपूजन सोहळा अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला नागपूरवरून हेलिकॉप्टरने येत असताना हेलिकॉप्टर अचानक ढगात भरकटलं, असा किस्सा दादांनी सांगितला.