ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती पण…. फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा त्यांचा आग्रह होता, असंही त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती. तर उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचं वाटत असावं असं वाटतं, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालानंतर ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत नव्हतं. नाव पुढे येत नव्हतं म्हणून ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. ठाकरेंनी राणेंना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली.’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. लोकसभेला 30 जागा लढाव्यात असा त्यांचा आग्रह होता, असंही त्यांनी म्हटलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं.