पुढच्या तीन महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतो, असा दावा करत देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ कार्यकर्त्यांना सुनावलं
उदासीनता पसरवणाऱ्यांनी घरी बसावं, असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असून लढणारे मावळे सोबत आले तर पुढच्या ३ महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतोय, असा दावाही यावेळी त्यांनी व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उदासीनतेच्या विधानावरून ठाकरे गटाने मात्र त्यांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या भाजप बैठकीत काही उदासीनता पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे. उदासीनता पसरवणाऱ्यांनी घरी बसावं, असं थेट देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं असून लढणारे मावळे सोबत आले तर पुढच्या ३ महिन्यात पुन्हा सत्ता आणून दाखवतोय, असा दावाही यावेळी त्यांनी व्यक्त केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या उदासीनतेच्या विधानावरून ठाकरे गटाने मात्र त्यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील भाजपच्या बैठकीतून महायुतीवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेला खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे हे कळालं आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीला महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास ही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान अमरावतीच्या भाजप बैठकीत कार्यकर्त्यांकडून संकल्प करण्यात आला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांसह अनिल बोंडेंनी केला आहे.