मनसेला महायुतीमध्ये सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिले सूर मेरा… काय दिले संकेत?
गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होतांना दिसताय. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षासोबत युती करणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली... बघा काय म्हणाले मनसेला महायुतीत घेण्याबाबत?
मुंबई, १ मार्च २०२४ : ‘टीव्ही 9 मराठी’च्या लोकसभेचा महासंग्राम कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विशेष मुलाखत घेण्यात आली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांना अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर आपली मतं मांडली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होतांना दिसताय. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षासोबत युती करणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आमचे संबंध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असं नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही. त्यांचे आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमची युती होणार आहे. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी स्थिती यायची आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.