Devendra Fadnavis : राज्यातील कंत्राटी भरतीचे दोषी कोण? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
VIDEO | कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गदारोळ सुरू आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला जातोय. दरम्यान, राज्यातील कंत्राटी भरतीवरूनच देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केलाय.
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी भरतीचा निर्णय काँग्रेस सरकारचाच होता. नंतर उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरती कऱण्याचं धोरण स्वीकारलं आणि त्यासंदर्भातील जीआर काढण्यात आला होता. तो जीआर आम्ही रद्द करत आहोत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे आमच्या सरकारचे धोरण असू शकत नाही असे म्हणाले, तर कंत्राटी भरतीसंदर्भात राज्यात मोठ्या प्रमाणात गदारोळ उठवण्याचा प्रयत्न सुरूये. याचे दोषी जे असतील, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करताय, म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण? हे समाजापुढे आले पाहिजे. यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस थेट म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, कंत्राटी भरतीबाबत आरोप केले जात होते. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना शिक्षण विभागात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना जीआर निघाले. त्यामध्ये शिक्षकपदापासून विविध पदांवर कंत्राटावर भरती करण्यात आली असल्याची महिती फडणवीस यांनी दिली.