स्वत:चं घर भरण्यासाठी मविआने सत्तेचा वापर केला, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
VIDEO | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा घेतला समाचार, काय म्हणाले बघा...
नाशिक : भाजपच्या प्रवासात काही शहारांची आपली भूमिका असून काही शहरं ऐतिहासिक, पौराणिक आहेत. त्यातील एक म्हणजे नाशिक. इथे संकल्प घेतला की त्यांच्या पूर्ततेसाठी रामाचा आशीर्वाद मिळतो. या देशात ज्यांना अहंकार आहे तो संपवण्याचे काम २०१४ पासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात होतंय, आणि सामान्यांचं सरकार काय आहे हे जनतेला बघायला मिळत आहे. ज्या भाजपने शतप्रतिशत असा नारा दिला, ती नाशिकची भूमी आहे. हा नारा जेव्हा दिला तेव्हा अनेकांनी टीका केली. पण भाजने दाखवून दिले की भाजप नंबर १ चा पक्ष आहे. तर आज याच भूमीवर महाविजयाचा मंत्र भाजपने घेतला आहे. येत्या काळात महाविजय अभियान देखील सुरू होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. गेली अडीच वर्ष राज्याची वाया गेली आहे. या अडीच वर्षात जनतेचं परिवर्तन होऊ शकलं असतं ते झालं नाही. त्यांनी केवळ स्वत: परिवर्तन कसं होईल हे पाहिजे. स्वतःचं घर भरण्यासाठी महाविकास आघाडीने सत्तेचा वापर केल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.