देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे मानले आभार! पण का? बघा व्हिडीओ
VIDEO | दुर्दैवाने एका पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत लगावला टोला
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित राज्यस्तरीय महसूल परिषदेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले होते जे काय घडलं त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. ते म्हणाले ‘संजय राऊत यांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. याबदद्ल मी त्यांचे आभार मानतो. पण अलिकडच्या काळात संजय राऊत जे बोलताय ते अजिबात गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र दुर्दैवाने एका पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे बोलताना त्यांनी सयंम पाळला पाहिजे तसेच वस्तुस्थिती पाहून भाष्य केले पाहिजे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकेच नाहीतर राऊतांनी किमान लोकांना खरं वाटेल असे तरी बोलायला हवं. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.