Special Report | भोंग्यावरून पुन्हा वाद, ‘३ भोंगे, ३ वेळांना वाजतात’, मविआच्या नेत्यावर कुणाचा निशाणा
VIDEO | मविआच्या मतभेदांवर भाजप नेत्यांचं बोट, तर मविआ अभेद्य असल्याचा विरोधकांचा दावा, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्याच भोंग्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही असे म्हणत ३ भोंगे, ३ वेळांना वाजतात, असे म्हणत मविआवर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांच्या रोजच्या सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेवर भाजप नेत्यांनी निशाणा साधलाय. भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनी सिरीयल किलर म्हटलंय तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडे तीन वेळेचे तीन भोंगे असल्याची जोरदार टीका केली आहे. मात्र संजय राऊत यांच्या व्यतिरीक्त उरलेल्या कोणत्या दोघांना देवेंद्र फडणवीस यांनी भोंग्याची उपमा दिली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मविआच्या मतभेदांवर भाजप नेत्यांनी बोट ठेवले आहे. तर मविआ अभेद्य असल्याचा दावा विरोधकांनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट