'झुकेगा नहीं, घुसेगा साला; मैं फडतूस नहीं...', देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पा स्टाईलनं प्रत्युत्तर

‘झुकेगा नहीं, घुसेगा साला; मैं फडतूस नहीं…’, देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पा स्टाईलनं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 04, 2023 | 10:06 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस' असा शब्द वापरला. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

नागपूर : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ असा शब्द उच्चारला होता. ते म्हणाले होते, फडणवीस फडतूस गृहमंत्री आहेत. मात्र त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं”, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ते नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलत असताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर “तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने लेख छापला. म्हणाले, स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, सावकरांनी बलात्कार केला होता, इतकं भयानक लिहिलं होतं. पण यांना खुर्चीची चिंता होती. साधा निषेध सुद्धा केला नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यासोबत पायी चालत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू…”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Published on: Apr 04, 2023 09:53 PM